कोरोना व्हायरस: बार्शीत नियम धाब्यावर बसवून गर्दी करत मटणाची विक्री सुरु

0
383

कोरोना व्हायरस: बार्शीत नियम धाब्यावर बसवून गर्दी करत मटणाची विक्री सुरु

तीन ते चार तास होत्या मटणाच्या दुकासमोर लांबच रांगा, ना मास्क ना सॅनिटायझर, एक मिटरचे अंतर तर नाहीच

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी प्रतिनिधी : कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये यासाठी शासन करीत असलेल्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील किराणा व्यावसायकि तसेच भाजीविक्रेत्यांनी पालिका व पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करीत आपल्या सेवा देत आहेत़ मात्र शहरातील मटण विक्रेत्यांनी मात्र या नियमाला धाब्यावर बसवत बिनधास्तपणे मटण विक्री सुरु ठेवली आहे .

गुढीपाडव्यादिवशी पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे प्रतिनिधी यांची बैठक पोलीस स्टेशनामध्ये पार पडली़ यामध्ये किराणा दुकानासमोर गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून नागरिकांनी माल घेऊन जावा़ भाजीमंडई देखील एकाच ठिकाणी गर्दी होते म्हणून शहरातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी ती ुसुरु केली त्यानूसार भाजीपाला विक्री होत आहे़ मुळात मटण व चिकनची दुकाने सुरु ठेवणे गरजेचे नसताना मंगळवार,शुक्रवार व रविवारी ती सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे .

आज शहरातील एकविकराई गल्ली, मुल्ला गल्ली, कसबा पेठ आदी भागातील मटणांच्या दुकानासमोर मटण खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी

केली होती़ याठिकाणी संचारबंदीच्या काळात असलेल्या एकाही नियमांची अंमलबजावनी केली जात नव्हती़ लोकांनी मास्क बांधलेले नव्हते़ तसेच सुरक्षित अंतर ही ठेवलेले नव्हते .

बार्शी शहरात शंभरपेक्षा जास्त मटण व चिकन विक्रीची दुकाने आहेत़ यातील बहुतांश दुकांनाना अधिकृतपणे मांस विक्रीचा

परवानाच नाही़ शासनाच्या व आरोग्य विभागाच्या नियमानूसार मांस विक्री ही बंदीस्त ठिकाणी करणे गरजेचे आहे़ त्यासाठी काचेची बंदिस्त खोली असणे आवश्यक आहे . मात्र बार्शीत राजरोसपणे रस्त्यावर उघड्यावर मांस टांगून त्यांची विक्री केली जात

आहे .

शासनाचे लावलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे व गर्दी टाळण्याच्याशासनाच्या आदेशाचे याठिकाणी पूर्णपणे उल्लंघन होत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा विस दिवस मटण नाही खाल्ले म्हणून कोणी मरणार नाही मात्र या गर्दीमुळे धोका आधिक आहे .त्यामुळे गरज नसताना ही दुकाने सुरु करण्याची गरजच नव्हती, आता सुरुच केली आहेत तर नियम पाळणे गरजेचे आहे़ त्यामुळे अशा गर्दी करुन मटण विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची गरज आहे़ पालिका व पोलीस प्रशासनाने

कोणाला खुश करण्यासाठी या दुकानाला विक्री करण्याची परवानगी दिली अशी शंका व्यक्त होत  आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur