गणेश भोळे- 8888528787
बार्शी: कोरोना व्हयरस चा वाढत चाललेला चा प्रसार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सोलापूर चे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजले पासून जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने आज बार्शीत100 टक्के ते आदेश पाळण्यात आले. मात्र तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकाने चालू होती अशा सहा दुकाने आणि त्यांच्या मालकावर बार्शी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झालेले दुकाने व मालक पुढील प्रमाणे.

सोलापूर रोड येथील गुलाब टिंबर , मालक कुबेद बागवान , रा . रोहिदास नगर , भारत विजय टिंबर – मालक अमोल करडे , रा. कैकाडी चाळ . लोकसेवा हेअर कटिंग सलून , सोमवार पेठ – मालक अंनत राउत ,रा. गाडेगाव रोड . बार्शी बस स्थानक समोर तंबाखू जन्य पदार्थ विकणारी पानटपरी – मालक विलास कौठाळकर ,रा विठ्ठल नगर . मंगळवार पेठ येथील गरीब नवाज हॉटेल – मालक बदुल्जरीन नुरी रा. मंगळवार पेठ . मार्केट यार्ड येथील भगवंत टी हाउस – मालक धनराज लोकरे . बस स्थानकातील जनरल स्टोअर बाबत मालक अमोल गारे , दत्तत्रय कटारे अशी गुन्हे दाखल झालेली दुकाने आणि त्यांचे मालकांची नावे आहेत.
बार्शी शहर पोलिसांनी या बाबत सोलापूर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश चे उल्लंघन करून आपली आस्थापना चालू ठेवल्याने भारतीय दंड संहिता चे कलम १८८ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम ५१ (अ ) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
हे गुन्हे बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शना खाली बार्शी तील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखल केले आहेत.