कोरोना व्हायरस: आदेश डावलून व्यवसाय सुरु; बार्शीत माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

0
377

कोरोना व्हायरस: आदेश डावलून व्यवसाय सुरु; बार्शीत माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

बार्शी – लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येवून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, संचारबंदी करून लॉक डाऊन केले आहे.यासाठी पोलिस प्रशासन दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे.असे असताना बार्शीत मात्र माजी नगरसेवकाने प्रशासनाचा आदेश धुडकावून आपला व्यवसाय चालू ठेवला असल्याचे उघडकीस आले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक संदेश कृष्णदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना सुभाषनगर भागातील ताडसौंदणे रस्त्यावर वीटभट्टीचे कामकाज चालू असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी तेथे जावून पहाणी केली असता माजी नगरसेवक बाबूराव अर्जुन जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून आपली वीटभट्टी चालू ठेवली असल्याचे आढळले. त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहीता चे कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur