कोरोना विषाणुला रोखण्यासाठी बार्शीत यंत्रणा सज्ज उभारले कोरंटाईन सेंटर , आयसोलेटसाठी ५०० बेड तयार

0
395

कोरोना विषाणुला रोखण्यासाठी बार्शीत यंत्रणा सज्ज

उभारले कोरंटाईन सेंटर , आयसोलेटसाठी ५०० बेड तयार

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गणेश भोळे

बार्शी प्रतिनिधी : जगामध्ये सध्या सर्वत्र कोविड- 19 (कोरोना ) या विषाणू ने थैमान घातले असुन याच्या पाश्र्र्वभुमिवर बार्शी तालुक्यात कोरानासाठी आयसोलेट साठी शहरातील समाजकल्याण विभागाचे मुलामुलीचे वस्तीगृहसह  शिवाजी महाविदयालयाचे मुलामुलीचे वस्तीगृह ताब्यात घेऊन त्याचेच सर्व सोयीनियुक्त सुमारे एकुण ५०० बेडचे आयसोलेट सेंटर उभारल्याची माहीती बार्शी तालुका वैदयकिय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली यावेळी तहसीदार प्रदिप शेलार हेही उपस्थीत होते .


यावेळी प्रथम डॉ. जोगदंड व तहसीलदार प्रदिप शेलार यांनी  आयसोलेट सेंटरला भेट देवुन पाहणी केली . यावेळी पुढे डॉ जोगदंड म्हणाले तसेच याव्यतीरिक्त जर कोरोनाग्रस्त रुग्न आढळला तर त्यास पुढील उपचारासाठी डॉ जगदाळे मामा हॉस्पीटल बार्शी, सुविधा हॉस्पीटल बार्शी, कॅन्सर मेमोरियल हॉस्पीटल बार्शी , डॉ संजय अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पीटल बार्शी येथे प्रांतधिकारी हेमंत निकम, बार्शीचे तहसिलदार प्रदिप शेलार , वैदयकिय अधिकारी डॉ शितल बोफलकर यांचे मार्गदर्शनानुसार जी कोरोना रुग्नांसाठी आवश्यक सोय केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० बेड तयार ठेवली असुन येथे मुक्कामाची सोय  , वैदयकिय स्टॉफ जेवण नाष्ठा असा उपलब्ध करुन दिला जाणार आहे .

बार्शी शहरात सध्या परदेशी वारी करून आलेले ४ तर  इतर ४ असे एकुण आठ जण होम कोरंटाईन आहेत

बार्शी शहर व परिसरातील १३ जण होम कोरंटाईन होते त्यापैकी आज अखेर १४ दिवसाचा कालावधी उलटल्याने त्यांना होम कोरं टाईन मधून बाहेर काढले आहे तर शहरात सध्या परदेशी वारी करून आलेले ४ जण होम कोरंटाईन आहेत तर इतर चार जणांची तपासणी केल्यानंतर त्यांचेत काही प्रमाणात लक्षणे आढळल्याने दक्षता म्हणून असे एकुण शहरात आठ जण कोरंटाईन केले आहेत.

पुणे मुंबईकर असलेल्या बार्शीकरांची जबाबदारी वाढली
सध्या पुणे मुंबईमध्ये कोरोनाचे रूग्न आहेत परंतु पुणे मुंबई येथुन गावी आलेला बार्शीकर हाही मुळचा बार्शीकर आहे .परंतु असे गावी आलेल्या लोकांची जबाबदारी खुपच वाढली आहे  त्यांनी आपल्या घरातच राहवं जर त्यांचेत काही लक्षण वाटली तरी त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला अवगत करावं असं आवाहन बार्शी तालुका वैदयकिय अधिकारी डॉ जोगदंड यांनी केल आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur