कोरोना लढयासाठी 10 कोटींचे साहित्य: हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार…!

सध्या देशभरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यामुळे या संकटाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीचा आवाज दिला होता या हाकेला प्रतिसाद देत अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – 19 या खात्यात रक्कम जमा केली होती.

आता मुख्यमंत्र्यांच्या अहवानाला हो देत हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली आहे. २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी यंत्र सामग्रीचा यात समावेश आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले.

हिंदुस्थान युनिलिव्हर लि. कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक (oxygen concentrators) यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे बिझिनेस ॲन्ड कम्युनिकेशन हेड श्री. प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे.
