कोरोना बचावासाठी या गोष्टी सतत केल्या पाहिजे, केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचना

0
283

कोरोना बचावासाठी या गोष्टी सतत केल्या पाहिजे, केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचना

ग्लोबल न्युज: देशासह महराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे हा कहर सुरु असताना या आजारापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून विविध मार्गांचा तसेच सूचना देण्याचा वापर केला जात आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा एक अपिल केले आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगण्यात आल्या आहेत.

लोकांनी सातत्याने आपले हात धुतले पाहिजेत
इतरांपासून सुरक्षित अंतर राखलं पाहिजे, असं हे अपिल आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनच नव्हे तर संपूर्ण जगभरात याच सूचना दिल्या जात आहेत आणि वारंवार त्याची लोकांना आठवण करुन दिली जात आहे. अजूनही या आजारावर लस सापडलेली नाही त्यामुळे काळजी घेणं हाच या आजारावरील सर्वात मोठा उपाय आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. मुंबई-पुण्यासह काही शहरांमध्ये या आजारानं आपले चांगलेच हातपाय पसरले असून प्रशासन या आजाराला अटकाव करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur