कोरोना इफेक्ट : मानाच्या सात पैकी चार पालखी सोहळा प्रमुखांनी घेतला हा निर्णय

0
280

कोरोना इफेक्ट : मानाच्या सात पैकी चार पालख्या रद्द

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: सध्या राज्यात कोरोना या सासर आजराने थैमान घातलेले असताना आहे. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या पालखीचे स्वरूप कसे असावे याबाबत पालखी सोहळा आयोजक गोंधळात पडले होते. मात्र आता यावर पालखी आयोजकांनी तोडगा काढला असून मानाच्या सातपैकी चार पालख्या रद्द करण्यात येणार आहे.

एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सात मानाच्या पालख्यांपैकी पैठणची एकनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज पालखी, जळगावच्या मुक्ताईनगरची मुक्ताईनगर पालखी आणि सासवडची सोपानकाका पालखी यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आल्या आहेत.

नेहमीचा पालखी सोहळा रद्द करताना परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही या पालख्यांनी सरकारला दिले आहेत. त्यापैकी सरकार जी परवानगी देईल, त्यानुसार पालखी सोहळा करण्याची तयारी असल्याचे रघुनाथ महाराज गोसावी यांनी म्हटलं आहे.

प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. म्हणजे पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल आणि दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. दशमीला तीस मानकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रेविषयी सध्या संभ्रमावस्था आहे. दरवर्षीप्रमाणे राज्याच्या विविध भागातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला येणार किंवा नाही याविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान तसेच अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. कोरोनामुळे यंदा पालखी सोहळा कशा पद्धतीने काढण्यात यावा याविषयी दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी तसेच महसूल, आरोग्य आणि पोलिस अधिकारी यांनी त्या बैठकीत आपापली मते मांडली होती. शासनाने त्यानंतर अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.

दरम्यान सोहळ्यातील सहा मानाच्या पालख्या पैकी श्री संत एकनाथ, श्री संत सोपानकाका, श्री संत निवृत्तीनाथ आणि श्री संत मुक्ताबाई या चार संस्थानांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू नये यासाठी यंदा केवळ पाच वारकऱ्यांना पायी पंढरपूरकडे जाण्याची परवानगी मागितली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur