कोरोना अपडेट: बार्शी शहरातील आठ संशयितांचे स्वॅप तपासणीसाठी सोलापूर ला पाठवले
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात पुणे-मुंबई-सोलापूर आदी कोरोना बाधित शहरातील प्रवासाचा इतिहास असलेल्या व कोरोना सदृश लक्षणे असलेल्या आठ जणांचे स्वॅप शनिवारी रात्री उशिरा घेऊन पुढील तपासणी साठी सोलापूर ला पटेल असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.


बार्शी शहर तालुक्यातील संस्थात्मक अलगिकरण कक्षात 100 जणांना क्वारंटाइन केले आहे.यातील पुणे- मुंबई तसेच सोलापूर शहरातील प्रवासाची हिस्टरी असलेल्या 8 जणांचे स्वॅप आज रात्री घेण्यात आले. यातील वैराग येथील पती पत्नीने सोलापूर येथे उपचार घेतले असल्याची माहिती आहे. तर आगळगाव येथील एक जण आहे. बार्शी शहरातील मंगळवार पेठेतील चार तर 422 भागातील एक संशयित रुग्ण आहे.
आज दुपारी स्वॅप घेण्यासाठी विलगिकरण कक्षातील दोघाचे स्वॅप घेतले जाणार होते.त्यातील एक जण हा पळून गेला. विशेष म्हणजे त्यालाच जास्त लक्षणे होती.पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही.रात्री स्वतःहून तो संशयित ग्रामीण रुग्णालयात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
