कोरोनाला घाबरू नका; या ‘त्रिसूत्री’ चा वापर करा-आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
356

त्रिसूत्री म्हणजेच स्व-अंतर, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे जिकरीचे आहे – राजेश टोपे

येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनाबाबरोबर जगताना आपल्या जीवन शैलीत कोणते बदल करायला हवे याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन केले आहे. राजेश टोपे हे ‘झी २४ तास’च्या ‘ ई-संवाद – महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ या खास कार्यक्रमात बोलत होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

यापुढे घराबाहेर पडताना त्रिसूत्र वापरण्याची गरज आहे. त्रिसूत्र म्हणजे एसएमएस. ही SMS प्रणाली वापरणे गरजेचे आहे. स्व-अंतर , मास्क, सॅनिटायझर याची आपल्याला गरज लागणार आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरु नका, समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा. जीवनशैली बदलायला हवी. कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असे सांगत राजेश टोपे यांनी कोरोनानंतर महाराष्ट्र कसा असेल, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिक स्पष्ट केली.

कोरोनापासून न घाबरता बाहेर पडा. येत्या दीड महिन्यात कोरोनावर नियंत्रण मिळण्यात यश, येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘या एकजुटीने  कोरोनाला हरवायचे आहे. त्यासाठी सावध राहा आणि ही बाब समजून घ्या.  जनजागृती करण्यावर भर द्यावा. लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजीपर्यंत अनेकजण  कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकले पाहिजे. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्‍या दृष्टिने सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here