कोरोनाबळीमध्ये सतत वाढ, आज नव्याने दोन रुग्ण आणि दोन मयत, एकूण कोरोनाबाधित २७७, एकूण मयत १९

0
258

कोरोनाबळीमध्ये सतत वाढ, आज नव्याने दोन रुग्ण आणि दोन मयत, एकूण कोरोनाबाधित २७७, एकूण मयत १९

सोलापुरात आज नव्याने दोन रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले असून त्या दोनही महिला आहेत.त्यापैकी एक आसरा सोसायटी होटगी रोड येथील 1 महिला असून दुसरी महिला ही शिक्षक सोसायटी सोलापूर येथील रहिवासी आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांमध्ये 158 पुरुष तर महिला 119 आहेत एकूण रुग्णसंख्या 277 झाले आहे तर आजपर्यंत 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यामध्ये दहा महिला असून नऊ पुरुष आहेत आज मयत झालेली महिला हे 52 वर्षाची असून त्या रविवार पेठ परिसरातील होत्या तर दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परिसरातील 71 वर्षाचे पुरुष होते अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

आज एकूण 133 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 131 अहवाल हे निगेटिव्ह आहेत, तर पॉझिटिव्ह अहवाल दोन आलेले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे तर रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ही 31 आहे ज्यामध्ये 18 पुरुष तर तेरा स्त्रियांचा समावेश आहे आणि ही मोठी दिलासादायक बाब आहे.

एकूण तपासणी केलेल्या 3442 व्यक्तीपैकी 3231 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. तर अजूनही 211 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत आजपर्यंत निगेटिव्ह अहवाल 2954 जणांचे आले आहेत तर पॉझिटिव्ह 277 आहेत.

सोलापूरची ग्रीन झोन कडे वाटचाल होण्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे . जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास पुन्हा सोलापूर हे ग्रीन झोनमध्ये वेगाने जाईल.

Best IT Comany In Maharashtra , Solapur