कोरोनाच्या संकटातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी युवासेना आली धावून..

0
265

कोरोनाच्या संकटातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी युवासेना आली धावून..

सध्या जगभरात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रभाव देशातही वाढत चालला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाशी दोन हात करत आहेत. परंतु संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सर्व वर्गातील मजूर, कामगार, नौकरदार, विद्यार्थी सर्वांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यासोबत घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक इंजीनियरिंगचा विद्यार्थी स्वप्नील सोनवणे यांने एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. परंतु एमपीएससीच्या पोर्टलवरील टेक्नीकल प्रॉब्लेम मुळे १४ दिवसांपासून या विद्यार्थ्याचे ऑनलाईन पेमेंट होत नव्हते. १४ दिवसांत त्याने अनेक वेळा इमेल आणि फोन द्वारे संपर्क साधला असूनही त्याच्या परीक्षा फॉर्मचे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नव्हते.

ही अडचण दूर होत नाही हे समजताच त्या विद्यार्थ्याने युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्याशी संपर्क करून त्यांना ही तांत्रिक अडचण सांगितली. त्यावर वरूण सरदेसाई यांनी त्या विद्यार्थ्यास काळजी करू नको लवकरच तुझी अडचण सोडविली जाईल असा शब्द दिला. आणि अवघ्या दोन तासांच्या आत स्वप्नील सोनवणे यास मोबाईल वर संदेश आला की त्याचे एमपीएससीच्या परीक्षा फॉर्मचे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले गेले आहे.

१४ दिवसांपासून झटत असलेला प्रॉब्लेम अवघ्या काही मिनिटांत सोडवून त्याचा परीक्षा फॉर्मचा मार्ग मोकळा करुन दिल्याबद्दल त्या विद्यार्थ्याने वरूण सरदेसाई आणि युवासेना या दोघांचेही आभार मानले. कोरोनासारख्या भयानक परिस्थितीत सुद्धा युवासेना विद्यार्थ्यांच्या अडचणी लागोलाग सोडवत असल्याचे बघुन आनंद झाला असं स्वप्नील सोनवणे याने आभार मानताना सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur