कोरोनाच्या विरोधातील लढाईत ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचाही खारीचा वाटा

0
276

कोरोनाच्या विरोधातील लढाईत ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचाही खारीचा वाटा

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: ज्येष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समिती प्रांतिक सदस्य श्री नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या विरोधातील लढ्याला मदत म्हणून आज 25 हजार 80 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी करमाळ्याचे तहसीलदार श्री समीर माने व सहाय्यक निबंधक श्री दिलीप तिजोरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासिर कबीर, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे आदि उपस्थित होते.

सोबतच, करमाळा येथे शिवसेना तथा जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या शिव भोजन थाळी उपक्रमास 25 हजार रुपयांचे धान्य सुपूर्द केले. सोबतच शिव भोजन थाळीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या 1 हजार नागरिकांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली.

श्री नरसिंह चिवटे यांचा आज वाढदिवसनिमित्ताने शिवसेना शहरप्रमुख श्री प्रवीण कटारिया आणि करमाळा तालुका पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर यांनी विशेष सत्कार केला. यावेळी हिवरवाडीचे सरपंच राजेंद्र मरगळ, अर्बन बँकेचे माजी संचालक शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहर व तालुक्यातील अनेकविविध सामाजिक संघटना , सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार क्षेत्रातील मंडळींनी फोनवरून आणि समाजमाध्यमातून श्री नरसिंह चिवटे यांचे अभिष्टचिंतन केले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur