कोरोनाच्या लसीकरणावर काम सुरू, लवकरच लस तयार करण्याची पुण्याची योजना

0
252

कोरोनावर भारतातील पहिली लस पुण्यात विकसित!

कोरोनाशी लढणारी लस आता भारतात तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधन करुन हे काम सुरु केलं आहे. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.येत्या स्पटेंबर ते ऑक्टोबर पर्यंत 20 – 40 मिलीयन लस तयार करण्याचती पुण्याची योजना आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


पुण्याची स्थानिक प्रयोगशाळा सीरम इंस्टीट्यूट येथे कोरोनाच्या लसीकरणासंदरभात काम सुरू आहे. सिरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत न्यूमोनिया आणि डेंग्यू मोनोक्लोनल लस यासारख्या लसींवर मोठे काम केले आहे. लोकांना परवडेल अशा वाजवी दरात लसी या इंस्टीट्यूटने उपलब्ध करून दिल्या आहेत. आताही कोरोनावर मात करण्यासाठी हे इंस्टीट्यूट कोरोनाच्या लसीकरणावर काम करत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रवर्तक अदार पूनावाला यांनी सांगितले की, ही लस भारतात जवळपास एक हजार रुपयांच्या परवडणा-या किंमतीत उपलब्ध करुन देण्याची आमची योजना आहे. तसेच ते म्हणाले, आम्ही आशा करतो की, मे महिन्यापासून भारतात काही चाचण्या सुरू होऊ शकतील.

पहिल्या 100 लोकांवर या लसीकरणाचा प्रयोग करून पाहू हा प्रयोग यशस्वी झाला तर येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत भारतात किमान 2- -40 मिलीयन लसीकरणाचे डोस तयार करण्यात यश मिळेल. पूनावाला टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

ते म्हणाले, जगाच्या तुलनेत भारतात या लसीकरणाची किंमत कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोवर, गालगुंडा आणि रुबेला सारख्या इतर लसींच्या किंमती जशा विदेशात युके सारख्या देशात महागड्या दरात मिळतात मात्र भारतात या लसीकरणाचे अत्यल्प दर आहेत तसेच कोरोनाची लसदेखील भारतात कमीत कमी किंमतीत कशी उपलब्ध करता येईवल यासाठी प्रयत्न करत असल्याचेही पुनावाला म्हणाले. जेणेकरून भारतासारख्या देशातील प्रत्येक नागरिकाला सहज हे लसीकरण करता येईल.

ते म्हणाले, या लसीच्या पुर्वचाचणीसाठी आम्ही युकेची वाट बघणार नाही. हा निर्णय आम्ही स्वतःच्या रिस्कवर आणि खर्चाचा ताळमेळ बसवून घेत आहोत. लसीकरणाच्या चाचण्या यशस्वी झाल्यास उत्पादनासाठी लागणारा जो खर्च येणार त्यासाठी खर्चाचा ताळमेळ बसवण्याचे आव्हान असेल. मात्र, यासाठीही आमचे पुरेसे प्रयत्न सुरू असून, पहिल्या सहा महिन्यांसाठी दरमहा चार ते पाच दशलक्ष डोस तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

त्यानंतर आम्ही जसजसे लसीकरणाचे प्रयोग यशस्वी होत जातील तसे आम्ही उत्पादन वाढवू व दरमहा १० दशलक्ष डोस वाढवू वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. याप्रमाणे सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत 20-40 दशलक्ष डोस वाढवण्याचा आमचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आम्ही हे उत्पादन भारतासह जास्तीत जास्त देशांमध्ये उपलब्ध करुन देऊ. असे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रवर्तक अदार पूनावाला यांनी सांगितले टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur