कोरोनाच्या लढ्यात भारती विद्यापीठाचा मोलाचा वाटा

आजवर राज्यात आलेल्या प्रत्येक संकटांत मंत्री पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने मोलाचे सहकार्य केले आहे. आता पुन्हा राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटात भारती विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. पुणे महानगर पालिका व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारांतर्गत महानगर पालिकेच्या वतीने भारती विद्यापीठास पीपीई किट्स, N-95 मास्क , सॅनिटायझर्स व रुग्णांना औषधे दिली जाणार आहेत. भारती विद्यापीठात करोना संशयित रुग्ण व बाधित रुग्ण व्यवस्थापन, उपचार व मनुष्यबळ यांच्या मार्फत सेवा दिली जाणार आहे.

रुग्णांवरील खर्च मनपाच्या वतीने शासनाच्या CGHS नुसार भारती विद्यापीठास देण्यात येणार आहे. पुणे मनपाच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी व भारती विद्यापीठाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता जगताप व मेडिकल डायरेक्टर डॉ.ललवाणी यांनी करारावर सह्या केल्या.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा