कोरोनाचे लोण आता ग्रामीण भागात: जामखेड मधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 17 नगर जिल्हा 43 वर

0
244

अहमदनगर: जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ३ जणांची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील  बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. तर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ४१ जणांचे स्वॅब घेऊन  चाचणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे अहवाल काल रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित ३ अहवालाची प्रतीक्षा होती. ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. त्यात, जामखेडमधील या तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ४५ आणि ५० वर्षीय पुरुष तर ३५ वर्षीय महिला असे तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांनाही लागण झाली. त्यानंतर यापैकी एका युवकाच्या वडिलांना तर नंतर या युवकाच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या.

यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण असून या तिघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १४९५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४१९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १५ अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १२२ जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएसमध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur