कोरफळेत अनैतिक संबंधातून खून ; संशयित आरोपी अटकेत
बार्शी : तालुक्यातील कोरफळे या गावांमध्ये शिवाजी जगन्नाथ बाबर यांचा झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल झाली असून मयताचा मुलगा नित्यानंद बाबर यांनी फिर्याद दाखल केली आहे . हा खून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी बाबर (वय ६० वर्ष )आपल्या घरासमोर झोपले असता त्यांच्या डोक्यात दगड घालून कोरफळे गावचे रहिवासी अमीन इसाक आतार यांनी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


अधिक माहिती की , बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मयत शिवाजी बाबर आणि खून केलेला आरोपी अमीन इसाक आतार या गावी एकमेकांच्या घरासमोर राहत असून शिवाजी बाबर आणि आरोपी अमीन आतार यांची आत्या मीना आतार यांचे अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. याचं अनैतिक संबंधातून आमीन या आरोपीने आपली आत्या मीना आतार हीचा तीन वर्षाखालील खून केला होता.
मीना आतार यांच्या खुनामध्ये सदर आरोपी एक वर्ष अटकेत होता तो दोन वर्षापूर्वी सुटून आल्याने त्याने अनेक वेळा शिवाजी बाबर यांना तुमचाही खून करतो अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच मीना आतार यांचे शिवाजी बाबर यांच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जमीन विकली असल्याचे ही तो आरोपी सांगत होता.
याविषयी बार्शी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमीन आतार याने सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी बाबर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बार्शी तालुका ठाणे येथे भारतीय दंड विधान ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अमीन इसाक आतार यास अटक केली आहे.