कोणत्या जिल्हयात वाढणार लॉकडाऊन वाचा सविस्तर……!
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: कोरोना या संसर्ग आजराने संपूर्ण देशासह राज्यात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन वाढवणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नुकतीच ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. दरम्यान, राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा अनोख्या पद्धतीचा असेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

यामुळे हे लॉकडाऊन कसे असेल हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार व्यक्त केला आहे. हे भाग कोरोनामुळे अत्यंत प्रभावित झाले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या ठिकाणांवर प्रतिबंध वाढविण्यासदंर्भात चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने 31 मेपर्यंत मुंबई एमएमआर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लवकरच राज्याचा विचार केंद्राला लिखित स्वरुपात दिला जाणार आहे.
