कोटा मध्ये अडकलेल्या विध्यार्थांना पुन्हा आणण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न सुरू
सुरज गायकवाड
कोल्हापूर : सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. आज कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षणा निमित्त परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे हाल होत आहे.

हाच धागा पकडून इतर राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. याच पार्श्वभूमीवर कोटा मध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोक यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे.

महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. यामध्ये कोटामध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडावे अशी विनंती केली आहे. राज्यात माघारी परतल्यानंतर त्या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वांरटाइन करण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे.
याबाबत माहिती देताना राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली की राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे 1800 ते 2000 विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या परिवारनं त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत राज्य सरकार त्या विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे.