केवळ ‘हे ‘ करण्यासाठीअमेरिकेच्या व्हाइट हाऊसने मोदींना केलं होतं ट्विटरवर फॉलो

0
304

वॉशिंग्टन, ३० एप्रिल: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर देशभरात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता व्हाइट हाउसच्यावतीने याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अमेरिकेने अचानकपणे ६ अकाऊंटला अनफॉलो केले आहे. त्यामध्ये, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी व्हाईट हाऊसच्या @WhiteHouse या ट्विटर हँडलकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींचे कार्यालय (पीएमओ), अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर या सर्वांचे ट्विटर हँडल फॉलो करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी रिट्विट करण्यासाठी हे हँडल फॉलो करण्यात आले होते. व्हाईट हाऊसकडून केली जाणारी ही सर्वसाधारण प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur