केंद्रावर टीका करण्यापूर्वी तुमच्या तिजोरीतुन महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगा……!
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: कोरोनासारख्या जागतिक संकटकाळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ ठरले आहे, अशी टीका ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.


राज्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जे काम सुरू आहे ते केंद्र सरकारच्या मदतीने चालू आहे. केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांना केली आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण महाराष्ट्रात असूनही महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेचे पालकत्व पार पाडण्यासाठी स्वतंत्रपणे काहीही केलं नाही. उलट केंद्राने जी सामान्य लोकांना मदत केली त्यामध्ये अडथळे आणण्याचं काम राज्य सरकारने केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने आपल्या शेजारील राज्य कर्नाटकने 1600 कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्वतच्या खजिन्यातन कोणतंही मोठं पॅकेज जाहीर करत नाही. आता राज्य सरकारने कोरोनाच्या कठीण काळात स्वतंत्रपणे काय केलं, हे दाखवून द्यावं, असं पाटील म्हणाले आहेत.