केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
266

देव आपल्याजवळ आहे. जो संयम पाळत आहोत, तोच देव आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री रमजान तसेच अक्षय तृतियेच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. देव सध्या देवळात नसून तो डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये देव आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, दिनदर्शिका दीन झाल्या आहेत. हे दिवस कोणालाच अपेक्षित नव्हते. तरीही आपण लढाई होत आहेत, सर्व धर्मियांना माझ्याकडून धन्यवाद. सगळे जण घरातून प्रार्थना करत आहेत. मुस्लिमांनी घरातून प्रार्थना करावी. देव आपल्याजवळ आहे. जो संयम पाळत आहोत, तोच देव आहे. असे त्यांनी सांगितले.

देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच करोनामुळे २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. तसेच रूग्णसंख्येचा गुणाकार आपण रोखला आहे. कोरोनाचं हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं.

करोनामुळे राज्यातील काही भागातील परिस्थिती चिंताजनक आहे. हॉटस्पॉट असलेल्या भागात करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडं करोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. त्यातच मागील दोन दिवसात करोनामुळे मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन पोलिसांच्या मृत्यूवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉक्टर अत्यंत तणावाखाली काम करत आहेत. तसेच लॉकडाऊनचे चांगले परिणाम झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्ही गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

हिंदुस्तान कोरोनाचं हे संकट औषध बाजारात येण्या अगोदरच जिंकेल. हे युद्ध आपण आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकणार आहोत. आपला विश्वास आणि आपला आशिर्वाद हेच आमचं बळ आहे. असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी जनतेची कृतज्ञता व्यक्त केली.

कोणताही त्रास जाणवला तर फिवर क्लिनिकमध्ये जा. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच स्वतःची काळजी घ्या. घरात व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारतर्फे ३ फिवर क्लिनिक तयार करण्यात आले आहेत. छोटी मोठी क्लिनिक, हॉस्पिटल सुरू करा. आपण रूग्णसंख्येचा गुणाकार रोखला आहे. मुंबईत वर्दळ वाढवून आपल्याला चालणार नाही.

Best IT Comany In Maharashtra , Solapur