कुस्ती स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश.
बार्शी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धा दिनांक 14 ते 18 नोव्हेंबर 2019 या कालावधीत गुरू जांमबेश्वर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेकनाॅलाॅजी,हिसार.( हरियाणा ) येथे झाल्या.या स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय,बार्शीच्या आबासाहेब आटकळे यानी 61 किलो ( फ्री स्टाईल ) वजन गटात रोप्य पदक मिळवले व स्वप्निल काशिद यानी 74 किलो ( फ्री स्टाईल ) वजन गटात सलग दुसय्रावर्षी कास्य पदक मिळवले तर दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2019 या कालावधीत जालंधर येथे कुस्ती फेडरेशन ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या ओपन सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत ही आबासाहेब आटकळे यानी 57 कि. वजन गटात रोप्य पदक मिळवले.
तसेच महाराष्ट्रात आतिशय मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक 2 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीत म्हांळुगे बालेवाडी, पुणे येथे घेण्यात आली. या स्पर्धेत ही आबासाहेब आटकळे यानी माती विभागात 57 किलो.वजन गटात सुवर्ण पदक मिळवले तर स्वपनिल काशिद यानी 74 किलो ( मॅट )वजन गटात रोप्य पदक मिळवले.

विजयी खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ.हरिदास बारसकर, प्रा.संजय पाटील, प्रा.विजयानंद निंबाळकर, प्रा.रामहरि नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष डाॅ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव व्ही.एस.पाटील,सहसचिव पी. टी.पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर,संस्था कार्यकारणी सदस्य जयकुमार शितोळे आणि प्रा.डॉ.दिलीप मोहिते तसेच संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.प्रकाश थोरात, उपप्राचार्य.व्ही.जे देशमुख, डाॅ.भारती रेवडकर, डाॅ विष्णू वाघमारे, प्रा.तानाजी ठोंबरे, प्रबंधक प्रमोद जाधव, भाऊसाहेब पाटील, संतोष कवडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.