बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह वैराग मध्ये ही आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह
शहर व तालुक्यातील एकूण आकडा झाला 36
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना संसर्गामुळे बधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी सकाळच्या अहवालात बार्शी व वैराग येथील 21 अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका वासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.मात्र रात्री उशिरा आलेल्या अहवालात बार्शी शहरात असलेल्या तालुका पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कर्मचारी आणि यापूर्वी वैराग मध्ये पॉझिटिव्ह निघाला असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील दोन असे एकूण चार जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहर व तालुक्यात आजवर पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींची संख्या ही 36 झाली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड म्हणाले की, आज सकाळी बार्शीतील 15 आणि वैराग मधील सात असे 21 अहवाल हे निगेटिव्ह आले होते. तर बार्शीतील 19 ,वैराग मधील 3 ,घाणेगाव 1,व उपळाई ठोगे येथील चार असे 27 अहवाल प्रलंबित होते.
यामध्ये रात्री उशिरा चार जणांचे अहवाल आले. यातील दोन जण हे यापूर्वी पॉझिटिव्ह निघाला असलेल्या वैराग येथील रुग्णांच्या संपर्कातील आहेत. मात्र बार्शी शहरात असलेल्या तालुका पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कर्मचारी ही पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या दोन पोलीसातील एक जण बस स्थानक रोडवरील पोलीस वसाहतीमध्ये तर एक जण माढा तालुक्यातील चिंचोली येतील रहिवाशी आहे.

तालुक्यातील एकूण बधितांची संख्या ही 36 झाली आहे. यात वैराग व जामगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अठरा जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर बार्शीतील कोविड केअर सेंटरमध्ये 10 आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये 3 अशा 13 जणांवर उपचार सुरू आहेत.अद्याप ही 23 अहवाल प्रलंबित आहेत.