काळजी कोरोनाची ! ठाकरे सरकारच्या या महत्वाच्या 10 निर्णयांची आजपासून अंमलबजावणी

  0
  297

  मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या ४५ वर गेली आहे. दुबईतून रत्नागिरीत आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

  महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्वाचे १० निर्णय. यात मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात आले आहे. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येणार आहेत.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे.

  १. शासकीय कार्यालयात आता ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची आजपासून अमलबजावणी करण्यात येरणार आहे.

  २. रेल्वे, बस गाड्यांमधीलच प्रवाशी क्षमता कमी करणार. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करण्यावर भर

  ३. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्याचा निर्णय

  ४. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस, मेट्रो आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी सूचना

  ५. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना

  ६. मुंबई शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येणार

  ७. दुकानांच्या वेळा ठरविणार. सर्व दुकाने अंतरा अंतराने सकाळी आणि दुपारी सुरु करण्याच्या सूचना. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल

  ८. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध ठेवण्याचे निर्देश. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

  ९. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करणार.

  १०. जीवनावश्यक वस्तुंचा साठा करू नये. जनतेने जीवनावश्यक वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करणार.

  महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये घबराट आहे. याच पार्श्वभूमीवर दररोज पत्रकार परिषद घेऊन सद्यपरिस्थिती नेमकी काय आहे? काय उपाययोजना केल्या जात आहेत?नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची आवश्यकता आहे? याची माहिती दोन्ही नेते सातत्याने देत आहेत.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या तसंच आरोग्य आणि पोलिसांच्या सातत्याने बैठका पार पडत आहेत. यामध्ये शासन महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. तसंच या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती माध्यमांना समोर जाऊन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री देत आहेत.

  जेव्हापासून महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तेव्हापासून शासन आणि प्रशासन अतिशय गंभीर होऊन काम करत आहे. मग त्यामध्ये हॉस्पिटलमधली परिस्थिती, डॉक्टरांना सूचना, रूग्णालयात काय हवं नको, रूग्णांच्या अडचणी याकडे जातीने लक्ष देण्याचं काम मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री करत आहेत.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur