काँग्रेस भरणार परप्रांतीया मजुरांच्या रेल्वे तिकीटीचे पैसे

0
262

काँग्रेस भरणार परप्रांतीया मजुरांच्या रेल्वे तिकीटीचे पैसे
ग्लोबल न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सारकरने विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना आप-आपल्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती मात्र त्या मजुरांच्या तिकिटाचे पैसे कोण भरणार यावरून वादंग निर्माण झाले होते.

मात्र आता लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने आपल्या गावी परतत असलेल्या मजूर आणि कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार असल्याची घोषणा सोनिया गांधी यांनी केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यांनी ते ट्विट केले आहे. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य कॉंग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागानं गरजू मजूर व कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा प्रवास खर्च उचलावा. त्यांच्या तिकिटांचा खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत.

खरं तर राज्यांवर मजुरांच्या तिकिटाचा खर्च टाकून आणि त्यांच्याकडून भाडे वसूल केल्यानं विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी भाजपा विनाशासित राज्यांची आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच परराज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना रेल्वेने आपापल्या गावी पाठवले जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अगोदरच रोजगार गमावून बसलेल्या मजुरांना रेल्वे तिकीटाचा खर्च स्वत:च्याच खिशातून करावा लागत आहे. अनेक राज्यांनी तिकीटाच्या खर्चाचा भार रेल्वेनेच उचलावा अशी मागणीही केली होती. मात्र, केंद्र सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता.

Best IT Comany In Maharashtra , Solapur