काँग्रेसमध्ये एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष कधी बघितले नाही – राधाकृष्ण विखे पाटील
ग्लोबल न्यूज: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष असलेल्या कॉग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नाही. असे असतानाही ते लाचारासारखे सत्तेत कसे सहभागी आहेत. याबद्दल आपल्या आश्चर्य वाटत आहे. ‘एवढी वर्ष काँग्रेस सोबत राहिलो. मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष यापूर्वी आपण कधीच बघितले नाहीत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेसवर केली आहे.
गुरुवारी शिडीर्तील विविध समस्या आणि व्यावसायिकांच्या अडचणी संदर्भात बैठकीसाठी आले असताना ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी कॉग्रेस पक्षावर आणि प्रदेशाध्यक्षांवर सडकून टिका केली.

यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षां कोणी विचारत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. मी यापूर्वी असे लाचार प्रदेशाध्यक्ष कधीच बघितले नाही.
अग्रलेख पुन्हा लिहण्याची का वाट पाहावी. आपल्यात जर स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्तेला लाथ मारून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे. ते नाराज असतील तर सत्तेत का आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे, असे विखे म्हणाले.