औरंगाबाद | पैठण तालुक्यातील विहामांडवा शिवारात शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणाचा मुत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजता घडली. मयतामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. शनिवारी पैठण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात चार जण बुडून मुत्यू पावल्याची घटना ताजी असतांना आज रविवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

लक्ष्मण निवृत्ती कोडके वय ३०, वैभव रामनाथ कोरडे वय ३०, सार्थक लक्ष्मण कोरडे, वय ६, समर्थ ज्ञानदेव कोरडे वय १०, अंलकार रामनाथ कोरडे वय ९ वर्षे राहणार विहामांडवा तालुका पैठण येथील रहीवाशी आहे. असे मयतांची नावे आहेत. तीन लहान मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली असता पोहता येत नसल्याने मुलांनी आरडाओरडा केला त्यांना वाचवण्यासाठी वडीलांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा देखील या घटनेत मुत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जण बुडून मुत्यू पावल्याच्या घटनेमुळे विहामांडवा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.