औरंगाबाद रेल्वे अपघात जखमी मजुराने सांगितले: क्षणार्धात सर्व काही कसे संपले, कसा झाला अपघात

0
306

औरंगाबाद – औरंगाबाद जवळच्या बदनापूर-करमाड स्थानकादरम्यान आज पहाटे मालगाडी खाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हेलावून गेला आहे. जालण्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेले हे सर्व मजूर घरच्या ओढीने रेल्वे रुळाच्या मार्गे मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघाले होते.

सटाणा परिसरात ते रुळावर झोपी गेले असता मालगाडीने त्यांना चिरडले. यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचाराला नेताना मृत्यू झाला असून ३ जखमींवर उपचार सुरु आहे. दरम्यान, या भीषण रेल्वे अपघातून बचावलेल्या तीन मधील एका मजुरानं घडलेला सगळा प्रकार सांगितला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या तीन पैकी जखमी असलेल्या एका मजुरानं सांगितलं की, चालून चालून आम्ही थकलो होतो. पाणी प्यायलो आणि म्हटलं थोडा आराम करावा. त्याचवेळी रेल्वे रुळावर असतानाच थोडी धुंद आली आणि डोळा लागला. त्यानंतर समोरून कधी रेल्वे आली समजलंच नाही आणि माझ्या सहकाऱ्यांना चिरडून टाकलं. रेल्वे आल्याचं आम्हाला कोणालाच समजलं नाही. आमचा डोळा लागला होता. आम्ही सर्व १९ मजूर होतो. सर्व जण मध्यप्रदेशातीलच होतो. पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील होतो, असं तो म्हणाला आहे.

पुढं बोलताना त्याने म्हटलं की, या अपघातातून आम्ही काका आणि पुतणे बचावलो आहे. माझ्या पुतण्याचं वय १९ वर्ष असून, माझं वय २१ वर्ष आहे. आम्ही दोघेही जानेवारीमध्ये येथे आलो होतो. घरी आई, बायको आणि दोन छोटी मुलं एकटीच असल्यानं आम्ही तिकडे निघालो होतो.

औरंगाबादवरुन बस किंवा ट्रक मिळेल या उद्देशानं आम्ही आलेलो. काल रात्री ४ ते ५ दरम्यान तिकडून निघालो होतो. काही ठिकाणी थांबून एक एक चपाती खाल्ली होती आणि इतर चपात्या पुढील प्रवासादरम्यान खाण्यासाठी ठेवल्या होत्या. पण काळानंच आमच्यावर घाला घातला, अशी भावना त्या मजुरानं व्यक्त केली.

याबाबत मिळालेल्या बातमीनुसार अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील हे सर्व १९ जण मजूर जालना येथील एका कंपनीत काम करतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हे मजूर जालना येथे अडकून पडलेले होते. याचवेळी, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु केल्याची माहिती या मजुरांना मिळाली.

तसंच ती रेल्वे भुसावळ येथून मध्यप्रदेशला जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता ते पोलिसांना चुकवून रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपी गेले असता पहाटेच्या सुमारास अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. मात्र काही कळण्याच्या आतमध्ये १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला असून तिघांना प्राण वाचविण्यात यश आले आहे

मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील हे मजूर चंदनझिरा परिसरात रहात होते. ते जालना औद्योगीक वसाहतीतील एका स्टील कंपनीत कामाला होते. वीस जण गुरुवारी (ता. सात) संध्याकाळी सात वाजता जालण्याहून रल्वे पटरी मार्गाने औरंगाबाद, मनमाड मार्गे भुसावळकडे जाण्यासाठी निघाले होते.



काही वेळातच त्यांना झोप लागली

औरंगाबाद तालुक्यातील करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सटाणा गावाच्या हद्दीत सर्वजण विश्रांतीसाठी रेल्वे रूळावर बसले. काही वेळातच त्यांना झोप लागली. त्यावेळी जालना येथून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल-पेट्रोलच्या गाडीने मजुरांना चिरडले. या दुर्घटनेत यात सोळा जण जागीच ठार झाले. दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

क्षणार्धात सर्व काही संपले

रेल्वे मालगाडीने क्षणार्धात सर्व मजुरांना चिरडले, ही घटना इतकी विदारक होती की सर्व मृतदेहांचे तुकडे झाले. हात एकीकडे, पाय एकीकडे, धड दुसरीकडे अशी अवस्था होती. या मजुरांच्या बॅग, पिशव्या. चपला बुट, पाकीट विखुरले होते. अर्धा किलोमीटरच्या परिसरात संपूर्ण मृतदेहाचे तुकडे झालेले होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur