औरंगाबाद: मालगाडीने 16 मजुरांना चिरडले, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

0
295

औरंगाबाद | परप्रांतीय मजुरांविषयी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका मालगाडीने प्रवासी कामगारांना रेल्वे रुळावर चिरडले. औरंगाबादच्या करमाडजवळ ही घटना घडली. यामध्ये 16 मजूर ठार झाले असून काही कामगार जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 5-6 च्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

औरंगाबादमधील करमाड येथे 16 मजूर रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद-जालना रेल्वे लाईनवर करमाड शिवारात परराज्यातील 17 मजूर मध्यप्रदेशात निघाले होते. यामधील 16 मजूर जागीच ठार झाले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी आहे. हे मजूर रेल्वे रुळावर झापलेले होते. दरम्यान मालगाडी खाली चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात आपला जीव गमावलेल्या लोकांविषयी शोक व्यक्त करत मोदींनी ट्विट केले आहे. औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेमुळे प्रचंड दुःख झाले आहे. असे पंतप्रधान म्हणाले. तसेच या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. दरम्यान रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान परराज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहे. त्यांना बस आणि विशेष ट्रेनच्या माध्यमातून आपापल्या गावी नेण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी अनेक रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र याच काळात औरंगाबादेतून ही दुर्दैवी घटना समोर आली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur