एका दिवसात तब्बल ४३ कोटी ७५ लाख रुपयांची दारू विक्री

0
384

मुंबई : राज्यात ४ मेपासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर दोन दिवसात राज्यात ६२ कोटी रूपयांची दारू विक्री झाली होती तर आजच्या एकाच दिवसात तब्बल ४३ कोटी ७५ लाख रूपयांची दारू विक्री झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत राज्यातील काही भाग वगळता दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.गडचिरोली,वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यात दारूबंदी असून,उर्वरित 33 दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहे. गर्दीच्या कारणास्तव मुंबई शहर, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, व लातुर या ठिकाणची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर,कोल्हापुर, सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव,भंडारा, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यात मद्याची दुकाने सुरू करण्यात आली आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सातारा, औरंगाबाद, जालना,बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपुर, व गोंदिया या जिल्ह्यातील दारूची दुकाने सुरू करण्यात आली नाहीत.तर रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यात मद्यांची दुकाने सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या दोन दिवसात ६२ कोटी रूपयांची दारू विक्री झाली होती तर आज एकाच दिवशी तब्बल ४३ कोटी ७५ लाख रूपयांची दारू विक्री झाली आहे.दोन दिवसात १६ लाख १० हजार तर आजच्या एकाच दिवसात १२ लाख ५० हजार लिटर दारू रिचवण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्यात २४ मार्च पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी,कर्मचारी तैनात आहे. काल राज्यात १२१ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ६२ आरोपींना अटक करण्यात आली असून २९ लाख ८० हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मार्च पासुन ५ मे पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ४ हजार ७५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून २ हजार ६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ४३० वाहने जप्त करण्यात आली असून १२ कोटी ५३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur