एकमेकांवर विश्वास आहे तोवर महराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार टिकणार – अमित शहा

0
273

एकमेकांवर विश्वास आहे तोवर महराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार टिकणार – अमित शहा

भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपांना फेटाळत महाराष्ट्रातल्या तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास आहे तोपर्यंत सरकार टिकणार असल्याचं भाकीत अमित शहा यांनी वर्तीवले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अमित शहा यांनी एका प्रसिद्ध वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी देशातील कोरोनाची स्थिती आणि केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. पण त्याचवेळी आम्ही सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न करणार नाही. नारायण राणेंना बोलण्याचं स्वातंत्र आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला सहकार्य करतोय, अशी भूमिका शहा यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, ‘काँग्रेसचे नेते एक बोलतात तर राष्ट्रवादीचे नेते दुसरंच बोलतात. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी जे म्हटलंय की भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावर आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या अंतर्विरोधातून कोसळणार आहे. आम्हाला सरकारला घालवायचं नाही तर जागं करायचं आहे,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.

Best IT Comany In Maharashtra , Solapur