उस्मानाबाद मध्ये दोन आरोपींकडून पाच दहा नव्हे तर चोरीच्या तब्बल 44 मोटारसायकली जप्त

    0
    309

    दोन आरोपींकडून पाच दहा नव्हे तर चोरीच्या तब्बल 44 मोटारसायकली जप्त

    उस्मानाबाद – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या दोन चोरटयाना अटक करून 44 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. डी.एम.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउपनि श्री. पी.व्ही.माने, पोहेकॉ- जगताप, पोना- शेळके, चव्हाण, दहिहंडे, कावरे, पोकॉ- सावंत, लाव्हरे पाटील, अशमोड, आरसेवाड, मरलापल्ले यांच्या पथकाने दि. 02.03.2020 रोजी 10.20 वा. सु. उस्मानाबाद येथील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या एका घरावर छापा टाकला.

    यावेळी शंकर भरत देवकुळे व त्याचा सहकारी अनिल उर्फ विठ्ठल अर्जुन मगर दोघे रा. फकिरानगर, उस्मानाबाद यांना ताब्यात घेउन विचारपुस करता त्या दोघांच्या ताब्यात पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून चोरुन आनलेल्या अंदाजे 14,56,990/- रु.किंमतीच्या विविध कंपनीच्या 44 मोटारसायकली आढळल्या.

    त्यापैकी 11 मोटारसायकलींचा मुळ चासी क्रमांक व इंजीन क्रमांक पुसून त्यावर इतरत्र वापरात असलेल्या त्याच कंपनी-मॉडेल- मोटारसायकलचा चासी-इंजीन क्रमांक उमटवून (Debossing) त्याच मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक पट्टी लाउन त्याच मोटारसायकलचे बनावट वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC Book) तयार करण्यात आले आहे. तर उर्वरीत 33 मोटारसायकलींना नकली वाहन नोंदणी क्रमांकाची पट्टी लावलेली आहे.

    या प्रकरणी पो.ठा. उस्मानाबाद (शहर) गु.र.क्र. 63/2020 भा.दं.वि. कलम- 379, 411, 413, 414, 465, 468, 471, 473, 474, 476, 482, 485, 486, 420 प्रमाणे पोहेकॉ- प्रमोद थोराद यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास स्था.गु.शा. चे पोउनि श्री. पांडुरंग माने हे करत आहेत. मोटारसायकल चोरी रॅकेट उघडकीस आणनारी ही चालू वर्षातील राज्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.

    या कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी स्था.गु.शा. पथकाचे अभिनंदन केले आहे.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur