उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन नवीन कोरोना रुग्ण सापडले; एकूण आकडा 38 वर

0
282

उस्मानाबाद, दि. 26 : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ ने वाढली आहे. उस्मानाबाद शहरातील एक, शिराढोण एक व तेर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर गेली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 25 मे 2020 रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवाला मधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur