उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवपदी(PS) बार्शीपुत्र अविनाश सोलवट

  0
  408

  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवपदी(PS) बार्शीपुत्र अविनाश सोलवट

  बार्शी – राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकार आता स्थिर होण्यास सुरुवात झाली असून मंत्रालयात विविध मंत्र्यांकडे सचिवांच्या नियुक्त्या केल्या जाऊ लागल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी सचिवपदी बार्शीपुत्र आणि सनदी अधिकारी अविनाश सोलवट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  अविनाश सोलवट हे येथील शंकरराव निबाळकर अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य हॉटेल निकीताचे मालक नेताजी सोलवट यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शिक्षण बार्शीच्या सुलाखे हायस्कूल तसेच शिवाजी महाविद्यालयात झालेले आहे.गेले 20 वर्षे शासनाच्या महसूल ,ऊर्जा जलसंपदा, पाणीपुरवठा,गृहनिर्माण, वित्त, विधानमंडळ सचिवालय इत्यादी अनेक विभागामध्ये कामकाजाचा त्यांचा अनुभव आहे.केंद्र शासनाच्या Department of personnel and training (DOPT) चे Natioanl Resouce Personal (राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते )म्हणून त्यांना मान्यता मिळालेली असून देशभरातील सर्व केडर च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ते घेत असतात.स्पर्धा परिक्षाच्या
  तयारी करणाऱ्या विध्याथ्यांना विशेष मार्गदर्शन ते करत असतात. उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांच्या खास पथकामध्ये बार्शीकरांना अविनाश सोलवट यांच्या निवडीने स्थान मिळाले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे मातृभूमी प्रतिष्ठान ,कृषी पदवीधर आणि बार्शीतील मित्रपरिवाराला आनंद झाला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  अविनाश सोलवट हे मातृभूमी प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असून ते कोअर ग्रुपचे सदस्य आहेत. या माध्यमातून अविनाश सोलवट यांनी गावाशी नाळ जोडली आहे. मातृभूमी प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक आणि विधायक कामांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. तसेच ते भगवंत मल्टिस्टेट सोसायटी आणि पाटील प्लॉट मधील सहयोग स्थानिक रहिवासी मंडळा चे ही मार्गदर्शक आहेत. शिवाय बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संचालक आहेत.

  मा.अजितदादांच्या सोबत ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन चे ही काम पाहतात. त्यांच्या या पदाचा बार्शी शहर आणि तालुक्याला निश्चितच फायदा होईल.
  मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या बार्शीकरांच्या मदतीलाही ते सदैव तत्पर असतात.त्यांच्या कारकीर्दीला शुभेच्छा..!

  Best IT Comany In Maharashtra , Solapur

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here