सध्या सोलापूर शहरांमध्ये कोरोना चा विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे .या विषाणूचा प्रसार रोखणे यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरांमध्ये शहर हद्दीमध्ये उद्या दिनांक 20 एप्रिल दुपारी 2 ते 23 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करून शहरातील सर्व आस्थापना व शहराच्या हद्दी बंद करण्यात येत आहेत असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
आदेश यांना लागू नाही…
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा करणारे खाजगी व सरकारी रुग्णालय ,दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर,वैद्यकीय सेवेची संबंधित कर्मचारी, त्यांची वाहने तसेच या संदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी
ऍम्ब्युलन्स सेवा ,रुग्णालयांमध्ये व दवाखान्यात संलग्न असणारे औषधाची दुकाने व इतर औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.

कायदेशीर कर्तव्य बजावीत असणारे अधिकारी कर्मचारी , पाणीपुरवठा, अग्निशामक दल,विद्युतपुरवठा पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी…
सकाळी सहा ते नऊ या कालावधीत दूध वाटप व विक्री
शहरातील पेट्रोल पंप सकाळी सात ते अकरा
तसेच या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने ,आरोग्य सेवा देणारी डॉक्टर्स ,कर्मचारी यांची वाहने व पोलीस विभागाच्या वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यात येतील.
सदर आदेशाचा उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केलं आहे.