‘उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहात आहे’, सुप्रिया सुळेंकडून कौतुक
खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील लोकांशी संवाद साधला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची राज्यातील स्थिती आणि त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत भाष्य केलं. तसंच यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याचं पाहायला मिळालं.
‘राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. उद्धव ठाकरे समोर येऊन सर्वांना दिलासा देत आहेत. उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहात आहे. आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी आपल्याशी बोलत आहे, असं लोकांना वाटतं,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
तसंच ‘सरकारवर कोणी टीका करत असेल तरीही आपले मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे आपला फोकस बदलायचा नाही. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या…त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.

सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक लाईव्हमधील ठळक मुद्दे :
विद्यार्थ्यांनी या वेळेकडे बोनस टाईम म्हणून पाहावा…अभ्यास करावा ,अनलॉकिंगसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून प्रक्रिया सुरू करावी ,अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतात ,कोणीही खोट्या बातम्या व्हायरल करू नयेत
लस येण्यासाठी अजून काही महिने जातील ,प्रशासन पूर्णवेळ काम करतंय त्याचा अभिमान, शहीद पोलिसांना श्रद्धांजली ,कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना सरकारकडून छोटीशी मदत म्हणून घरात एक नोकरी आणि 50 लाख रुपय देण्याची घोषणा करण्यात आली आहे ,अनलॉकिंगची तुम्ही जसी इच्छा आहे तशी माझीही… सर्वांना हात धुवा…मास्क लावा
माझ्या आईने यूट्यूबवर बघून मास्क बनवले..तेच मी वापरणार आहे
संपादन – अक्षय शितोळे