उंबर्गे च्या उपसरपंच पदी राहुल वालचंद मुंडे बिनविरोध

  0
  401

  बार्शी : उंबरगे ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंचपदी राहुल वालचंद मुंढे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  उपसरपंचपदाच्या निवडीसाठी उंबरगे ग्रामपंचायत कार्यालय पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच दिगंबर विधाते होते.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  नुतन उपसरपंच राहुल मुंढे,वालचंद मुंढे,ग्रामपंचायत सदस्य ऐजिनाथ झोडगे,रिंकल जाधव,मारूती टिळक, मैनाबाई भांगे , ग्रामसेवक प्रमोद बाबर आदी उपस्थित होते. निवडीबद्दल मुंढे यांचे अभिनंदन केले जात आहे. 

  राहुल मुंडे हे कृषी उद्योजक असून धनश्री कृषी केंद्राच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांची सेवा करत आहेत. राहुल यांचे वडील बाजार समितीचे माजी संचालक वालचंद मुंडे यांचे गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur