आरोग्यसेवेकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील- देवेंद्र फडणवीस

0
283

राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही, देशात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण ४ टक्के, महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के आहे. महाराष्ट्रात, मुंबईत कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. सर्व महानगरात कोरोनाचा कहर असून, राज्य सरकारची अद्यापही कोणतीही तयारी नाही, BKC ला सेंटर उभं केलंय, पण ते दोन दिवसात भरून जाईल आणि पाऊस पडला तर या सेंटरचं काय होईल?, सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.  

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भाजपानं आज ठाकरे सरकारविरोधात ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन पुकारलं असून, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. 

फडणवीस म्हणतात..

सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू!
आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता!
राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली. मात्र जनता सहन तरी किती करणार?

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही ताण न आणता, आपल्या घराच्या अंगणात भाजपा कार्यकर्ते आज राज्यभर जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत आहेत. हे आंदोलन यशस्वी करणार्‍या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे.

रज्यात शेतमाल खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे.

हातावर ज्यांचे पोट आहे, अशांना तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकही पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे.

ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी. मृतदेहांशेजारी उपचार, एका खाटेवर दोन रूग्ण!
कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही.
कोरोनाव्यतिरिक्त अन्य रूग्णांवरील उपचारांची स्थिती सुद्धा अतिशय वाईट!

आमचे पोलिस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे 1400 पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची काळजी नाही. अतिशय वेदनादायी चित्र आहे.

केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत.
भाजपाचे हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहे. रूग्णसंख्या 40 हजारावर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील.

Best IT Comany In Maharashtra , Solapur