मुंबईः मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना (Covid – 19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचदरम्यान राजेश टोपे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 162 वर पोहोचली असून 5000 पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात जवळपास 5 हजार पेक्षाही जास्त नागरिक आले असून एमओएच टीमच्या माध्यमातून या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांची यादी आली आहे. या यादीत 5,343 जणांची नावे आहेत. या सर्वांवर अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवलं जात आहे. त्यासाठी 4 हजार जणांचं पथक संपूर्ण मुंबईत कार्यरत आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


राजेश टोपे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रासारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 162 झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता 5343 इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं.