आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, सुशांतसिंग राजपुतच्या परिवाराची अमित शहाकडे मागणी….
अनेक चित्रपटातुन आपली कला सादर करणाऱ्या आणि अवघ्या कमी वयात यशाचे शिखर गाठणाऱ्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे जग सोडून अवघ्या 34 व्या वर्षी कायमचा निघून गेला आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसंच त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा बसला आहे. अशातच त्याच्या कुटुंबियांनी सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीबाबत नवी मागणी केली आहे.


महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. सुशांतच्या मृत्यूचा तपास केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून करावा, अशी मागणी सुशांतच्या नातेवाईकांनी केली आहे. सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुशांतच्या कुटुंबियांनी केली आहे.
सुशांत अतिशय हुशार होता. त्याचं देशावर मनापासून प्रेम होतं. समाजाविषयी त्याला आस्था होती. त्याचं कामही खूप उत्तम प्रकारे सुरू होतं. पण मग असं काय झालं की सुशांतने इतक्या टोकाचं पाऊलं उचललं? याचा सविस्तर तपास करावा, असं सुशांतच्या मामांनी म्हटले आहे.