मुंबई – कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसतोय. विशेषत: महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. हा आकडा चिंता वाढवणारा असला तरी राज्य सरकार अगदी खंबीरपणे आणि अतिशय संयमाने स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सोशल मिडिया द्वारे सातत्याने संवाद साधत आहेत.

अनेक पातळ्यांवर लढत आहेत. ते ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत, ते पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक करत, त्यांना कडक सॅल्युट ठोकला. तर, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही एकाच वाक्यात उद्धव ठाकरेंच्या कार्याचं कौतुक केलंय. उद्धव ठाकरेंमध्ये जाणवेला बदल त्यांनी लक्षवेधी असल्याचं म्हटलंय.


‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. जावेद अख्तर त्यांच्या परखडपणासाठी ओळखले जातात. अगदी अलीकडे त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरून टीका केली होती.
आता अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. तिने नेता असावा तर उद्धव ठाकरेंसारखा असे म्हटले आहे. या सर्वांच्या प्रतिक्रिया वरून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत हे सिद्ध झाले आहे.