आनंदाची बातमी : बार्शीतील ‘त्या’13 पोलिसांसह 14 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

0
202

बार्शी – सोलापूर ग्रामीण दलातील पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आलेल्या बार्शीतील चौदा जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर, या १४ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. मध्यरात्री उशिरा या १४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये, १३ पोलीस कर्मचारी आणि १ इतर अशा एकूण १४ जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.

सोलापूर पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. सदर पोलीस कॉन्स्टेबल हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून तो सोलापूर मुख्यालयात कार्यरत आहे. 22 एप्रिल रोजी तो बार्शीतील शिवशक्ती मैदानाच्या पाठीमागील भागात वास्तव्यास आला होता. त्यामुळे, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शनिवारी शोध घेण्यात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यामध्ये तेरा पोलीस आणि एक अन्य व्यक्ती संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने १४ जणांना तातडीने स्थानिक संस्थेत क्वार्टाईन करण्यात आले. याशिवाय या 14 व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेण्यात आला. या घटनेमुळे बार्शीकरांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

मात्र, क्वारंटाईन करण्यात आलेल्या १४ जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर, या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड यांनी सकाळी सकाळी बार्शीकरांना ही आनंदाची बातमी दिली. या बातमीमुळे बार्शीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, बार्शीकरांची चिंता आणि भीती दूर करणारी ही बातमी आहे. मात्र, तरीही नागरिकांनी अत्यावश्यक आणि महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सरकारी सूचनांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur