आनंदाची बातमी:बार्शी तालुक्याला ६३ कोटींचा सोयाबीन पिकविमा मंजूर

    0
    325

     बार्शी तालुक्याला ६३ कोटींचा सोयाबीन पिकविमा मंजूर

    शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास झाली सुरुवात

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    बार्शी ( गणेश भोळे )

    : यंदाच्या पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात तालुक्यात झालेल्याअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसून शेतकरी अडचणीत आला होता़ शासनाने या नूकसानीचे पंचनामे

    करुन हेक्टरी मदत दिली होती़ मात्र ती मदत तोकडी असल्याने िपकविमा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधी करत होते त्यानूसार पिक विमा कंपनीने सोयाबीनचा विमा मंजूर केला आहे़ बार्शी तालुक्यासाठी ६२ कोटी ८२ लाख ५० हजार ३८९ रुपये विमा ंमंजूर झाला आहे़ .

    बार्शी तालुक्यात मंडळवाईज मंजूर झालेला पिकविमा खालीलप्रमाणे

    आगळगाव- ७ कोटी ३ लाख १० हजार ३७९ , बार्शी- ४ कोटी ४८ लाख ७६ हजार ४०६ रुपये़ ,गौडगाव – ६ कोटी १५ लाख ८१ हजार १९५ रुपये
    खांडवी- ७ कोटी ४२ लाख ६ हजार ८६२़ 
    नारी- ८ कोटी ७० लाख १८हजार ७४३ रुपये़ पानगाव- ५ कोटी ७२ लाख ९६ हजार ७८ रुपये़
    पांगरी- ५ कोटी ८६ लाख ८० हजार ५१९ ़ 
    सुर्डी- ७ कोटी २६ लाख ७७ हजार ३८९ 
    उपळेदूमाला- ५ कोटी ८५ लाख ८ हजार ७५ रुपये़
    वैराग- ४ कोटी ३० लाख ९४ हजार ७४४ रुपये़ असा एकूण ६२ कोटी ८२ लाख ५० हजार ३८९ रुपये विमा ंमंजूर झाला आहे़ .

    पिकविमा देण्यासाठी बहुतांश पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे काढणी दरम्यान व काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेले उत्पन्न उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त दिसून येत असल्याने काढणी पश्चात नुकसान असून देखील

    नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या असमर्थता दर्शवत होत्या.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शेतक-यांनी विमा कंपनी व कृषी विभागाकडे अर्ज केले होते. तसेच नुकसानीची

    तीव्रता लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. विमा कंपनीने यंत्रणा नसल्यामुळे कृषी व महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याचे मान्य केले होते.परंतू कृषी व महसूल विभागाकडून विहित नमुन्यात झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सोयाबीन पिकाचा विमा मिळेल कि नाही, याबाबत सांशकता व्यक्त होत होती़

    चौकट – पिककापणी प्रयोगानूसार सर्कलवाईज विमा रक्कमात बदल

    पिककापणी प्रयोगामध्ये ज्या मंडळात उत्पन्न जास्त दिसून आले आहे अशा मंडळात हेक्टरी कमी पिकविमा मंजूर करण्यात आला आहे़ यामध्ये सर्वात कमी वैरागमध्ये ६७९०़७ तर सर्वात जास्त खांडवी मंडळात १७ हजार ८५७ ़५५ एवढा हेक्टरी विमा मंजूर झालाआहे़. तर आगळगाव-११४३३, ७१ , बाार्शी-१५२७३ , गौडगाव-७००३ , नारी-८१८७ ,
    पानगाव-११७२३ , पांगरी- ९५६९, सुर्डी- १४४२३,उपळेदूमाला-७०१९ याप्रमाणे
    संबधीत मंडळातील ज्या शेतकºयांनी पिकविमा भरलेला आहे,त्यांना प्रतिहेक्टरी वरीलप्रमाणे विमा मंजूर झाला आहे़ आज दि़ २९ पासून शेतकºयांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली

    Best IT Comany In Maharashtra , Solapur