आनंददायी: ‘या’ तीन औषधांचे मिश्रण वापरून ठणठणीत झाले कोरोना रुग्ण

0
302

ग्लोबल न्यूज : कोरोना विषाणूमुळे जगभरात आणि भारतात  हाहाकार माजला आहे. तर दुसरीकडे अद्याप कोरोनावर कोणतीही लस मिळाली नाही आहे. या सगळ्या परिस्थितीत हाँगकाँगमधून कोरोना विषाणूच्या उपचारांबाबत एक चांगली बातमी आली आहे.

संपूर्ण जग कोरोना विषाणूची औषधे आणि लस तयार करण्यात गुंतलेला असताना हाँगकाँगच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी काही औषधांचा वापर करून कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. हे संशोधन हाँगकाँग विद्यापीठात करण्यात आले आहे. येथे डॉक्टर क्वॉक-यंग-युवेन यांच्या पथकाने तीन औषधांचे मिश्रण तयार केले आणि ते १२७ रुग्णांना देण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, हाँगकाँगच्या ६ शासकीय रुग्णालयांमधील विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या १२७ रुग्णांवर औषधांचा वापर केला, असे सांगितले आहे. यापैकी ८६ लोकांना तीन औषधांचे मिश्रण देण्यात आले तर ४१ लोकांना इतर औषधांचे मिश्रण सामान्य औषधांसह देण्यात आले. तीन औषधांचे मिश्रण हे एक चांगले उपचार आहे की नाही यासाठी हा प्रयोग करण्यात आला आसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.


या ३ औषधांनी पडला मोठा फरक

हाँगकाँगच्या ६ रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेल्या ८६ लोकांची त्वरेने बरी झाली कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते.

तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल.


Best IT Comany In Maharashtra , Solapur