आता बार्शी शहरातील प्रत्येक वार्डात कोरोना समिती-आमदार राजेंद्र राऊत

0
275

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली नगरपालिकेची आढावा बैठक

प्रशांत खराडे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: आमदार राजेंद्र राऊत यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बार्शी नगरपरिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आजपर्यंत करण्यात आलेल्या यशस्वी आरोग्य सुविधा, उपाययोजना व भविष्यातील उपाययोजनेच्या संदर्भात व प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती घेऊन त्या संदर्भात आढावा बैठकीत चर्चा करून प्रत्येक खातेप्रमुखांना कामकाजासंदर्भात सूचना दिल्या.

यामध्ये प्रामुख्याने आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रथम बार्शी शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात नगरपरिषद व त्यांच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी अतिशय चोख भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या सर्व नगर परिषदेच्या टीमला आपल्याही आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले.


तसेच बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्या स्थानिक नगरसेवकाच्या अध्यक्षतेखाली व नगरपरिषदेच्या कर्मचारी तसेच त्या प्रभागातील शाळेचे मुख्याध्यापक, समाजसेवक व कोरोना योद्धा यांची एक समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या.

सध्या बार्शी शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्या त्या प्रभागातील समितीने, त्या प्रभागात उपलब्ध असणारी नगरपरिषदेची शाळा व इतर शासकीय अनुदानित शाळा यामध्ये त्या नागरिकांना कॉरंटाईन (अलगीकरन) ठेवण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.

समितीने सध्या दररोज आपापल्या प्रभागात फिरून, आपल्या प्रभागात कोणते नवीन नागरिक आले आहेत त्यांची माहिती घेऊन, त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्या शाळेमध्ये कॉरंटाईन करण्याचे सांगितले. समितीच्या सर्व सदस्यांनी आपसांत समन्वय ठेवून इतर आजारांचीही काळजी घेण्याची नागरिकांना सूचना देण्याचा सांगितल्या.आपल्या प्रभागात दक्ष राहण्याच्या सूचना प्रत्येक नगरसेवकास दिल्या.

स्थानिक पातळीवर या समितीला निर्णय घेण्याचे अधिकारही देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांनीही दक्ष राहून, न घाबरता या समितीला मदत करावी असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

बार्शी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा अभियंता अजय होनखांबे यांनाही सक्त सूचना दिल्या. येऊ घातलेल्या पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे त्यामध्ये ओढे-नाले साफसफाई, स्वच्छतेची कामे तातडीने सुरू करावीत असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्याधिकारी याना सूचित केले.

या दोन महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये नगर परिषदेमध्ये ज्या नागरिकांची बांधकाम परवानाच्या फाईल आलेल्या आहेत त्या सर्वांना नियमाप्रमाणे तात्काळ बांधकाम परवाने देण्यात येण्याच्या सूचना बांधकाम अभियंता भारत विधाते पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे सूचना देऊन इतर खर्चामध्ये कपात करण्याचेही आवाहन केले. येत्या सोमवार पासून बार्शी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती 100% ठेवण्याचे सांगितले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपली व कुटुंबाची दक्ष राहून, न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन केले. यासंदर्भात नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्वतःचा मोबा. 98 50 33 33 88, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी मोबा.80 07 08 11 1, मुख्याधिकारी शिवाजी गवळी मोबा 98 81 38 02 06, आरोग्य अधिकारी डॉ.विजय गोदापुरे मोबा.87 88 96 05 11 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. असिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, आरोग्य अधिकारी डॉ.विजय गोदापुरे, सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur