आता कामगार हवे असतील तर घ्यावी लागणार परवानगी – योगी आदित्यनाथ

0
406

आता कामगार हवे असतील तर घ्यावी लागणार परवानगी – योगी आदित्यनाथ

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार कठोर नियम असलेलं धोरण करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

देशातल्या कोणत्याही राज्यांला जर कामगारांची गरज पडली तर संबंधित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे कवच द्यावे लागणार असल्याचं मुख्यमंत्री योगींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वाईट वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं योगींनी सांगितलं.

स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात काम करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी अशी मागणीही योगींनी केली आहे. या आयोगाच्या माध्यमातून स्थलांतरितांच्या प्रश्नांवर काम करुन त्यांचे शोषण केले जाणार नाही यासंदर्भात काळजी घेतली जाईल, असं योगींनी सांगितलं.

दुसरीकडे रविवारीच योगी आदित्यनाथ यांनी मजुरांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशा शब्दात आदित्यनाथ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur