आज माणकोजी बोधले महाराजांचा संजीवन समाधी सोहळा; वाचा कोण होते बोधले महाराज

0
394

श्री संत माणकोजी महाराज बोधले संजीवन समाधी सोहळा , श्री क्षेत्र धामणगाव ता बार्शी जि सोलापूर

भगवान श्री पांडुरंगाने ज्यांना बोध केला म्हणून बोधले , छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरंभी सरदार व नंतर मार्गदशक गुरू असणारे , तसेच प्रत्यक्ष नवनाथानी दर्शन देऊन नऊ वस्तू प्रदान केल्या व जोग घ्यायला सांगितला , दशनाम पीठांपैकी भारती पिठाचा अनुग्रह लाभला .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रत्यक्ष संत तुकाराम महाराज यांच्या हस्ते धमाणगांवला विट्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापना केली , स्वतः विट्ठल रुक्मिणी मातेनी महाराजांना पाणगे खाऊ घातले , आज ही वैशाख वद्य द्वितीयेला पांडुरंगाचे वस्त्र घेण्याचा अधिकार मिळाला , नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय असा त्रिवेणी संगम महाराजांच्या चरित्रात आलेला आहे .

जेष्ठ वद्य तृतीया हा माणकोजी महाराज यांचा समाधी सोहळा दिन होय ,आजच्या दिवशी श्री क्षेत्र धामणगाव येथे माणकोजी महाराजांच्या समाधीची विधिवत पूजा ,अभिषेख होऊन सकाळी १० ते १२ या वेळेत माणकोजी महाराजांचे १० वे वंशज सद्गुरू प्रभाकरदादा बोधले महाराज यांचे पुष्यवृष्टीचे कीर्तन होते व त्यानंतर त्यांच्याकडूनच आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद चे आयोजन केले जाते .


या वर्षी कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा सर्व सोहळा लहान स्वरूपात नियम म्हणून केला जाणार आहे ,तरी सर्व भाविकांनी आपल्या स्वतःच्या घरीच माणकोजी महाराजांची प्रतिमा पूजन करून हा सोहळा साजरा करावा व हे कोरोना चे संकट लवकर दूर व्हावे आहि प्रार्थना करावी , आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही हा समाधी सोहळा पार पाडतो आहोतच ,आपण मात्र घरीच राहून चिंतन करावे ही विनंती.
श्री जयवंत प्रभाकरदादा बोधले
श्री क्षेत्र धामणगाव

Best IT Comany In Maharashtra , Solapur