आज महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसत आहे, महाविकास आघाडीला भेटला घरचा आहेर

0
256

आज महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसत आहे, महाविकास आघाडीला भेटला घरचा आहेर

सूरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या प्रधुर्भाव लक्षात घेता व तो आटोक्यात आणण्याची परिस्थिती नियंत्रित करताना आता राज्यातील नेतृत्त्वाने प्रशासकीय कौशल्य आणि दूरदृष्टी दाखवण्याची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे विरोधकांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यासाठी आयते कोलीत मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील कारभार मुख्यमंत्री नव्हे तर अधिकारीच चालवत असल्याची टीका केली होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची री ओढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात सामील झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेल्या परखड मतांमुळे महाविकासआघाडीची अडचण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

यावेळी चव्हाण म्हणाले की, अश्या संकटाच्या काळात राज्यातील नेतृत्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवण्याची गरज आहे. चांगल्या अधिकाऱ्यांची योग्य ठिकाणी तातडीने नियुक्ती करून त्यांना कामाला लावायला पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला पुढे घेऊन जाताना दूरदृष्टी ठेवावी लागेल.

प्रशासनातील अधिकारीच कारभार चालवतात असे आज जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आता चव्हाण यांनी केलेल्या विधानावरून विरोधक मुख्यमंत्र्यांना कश्याप्रकारे लक्ष करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur