आज एकादशी तर उद्या-मंगळवारी श्री भगवंत प्रकटोत्सव ;घरीच साजरा करण्याचे देवस्थान ट्रस्ट चे आवाहन

0
271

बार्शी – देशात सध्या कोरोना महामारीचं संकट असल्याने ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात १०२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आपला जिल्हा रेड झोनच्या यादीत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी काही लॉकडाऊन शिथितला घोषित केली, तर आपल्या जिल्ह्याला सतर्क राहावे लागणार आहे.कोरोना व्हायरस मुळे देशासह राज्यातील प्रमुख यात्रा-जत्रा ही रद्द केल्या आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर यंदाचा भगवंत महोत्सव ही रद्द केला आहे. मंगळवार दिनांक 5 मे रोजी  भगवंत प्रकट दिन घरीच साजरा करण्याचे आवाहन भगवंत देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटावर विलगीकरण आणि सोशल डिस्टन्स हाच उपाय आहे. त्यामुळे, यंदाचा भगवंत प्रकट दिन सोहळा आणि महोत्सव रद्द करण्यात आला आहे. केवळ, मंदिरातच नैमित्तिक पूजा-आरती करुन ‘श्री भगवंत प्रकट उत्सव’ साजरा करण्यात येईल. त्यामुळे ४ मे रोजी सोमवार तिथी एकादशी व्रत करुन दिनांक ५ मे रोजी मंगळवारी पहाटे श्री भगवंत प्रकट दिन आपआपले घरी साजरा करावा, व कोरोनाच्या संकटापासून भारताला, जगाला वाचविण्याची प्रार्थना श्री भगवंत चरणी करावी, अशी विनंती भगवंत देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष दादा बुडुख यांनी केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान, भगवंत देवस्थान ट्रस्ट कमिटीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत देऊ केल्याचेही ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. हभप जयवंत भोसले महाराज यांनीही श्री भगवंत प्रकट दिन घरातच साजरा करण्याची विनंती  एका व्हिडिओ द्वारे बार्शीकरांना केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur