बार्शी: नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी आयोजित खाजगी शाळांच्या आंतरशालेय सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक विद्या मंदिर बार्शी शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नगर पालिका प्राथमिक शिक्षण मंडळ बार्शी यांच्या तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात नगर पालिका कार्यक्षेत्रातील पंचवीस शाळांचा समावेश होता.

लहान गटातून आई तुळजा भवानी या गीताला प्रथम क्रमांक मिळाला. गेल्या वर्षीच्या विजयाची परंपरा अखंड राखत यंदाही मुलांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करत प्राथमिक विद्या मंदिर बार्शी या आपल्या शाळेस प्रथम क्रमांक मिळवून दिला.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका योगिता बेळे व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव महादेव बुचडे ,खजिनदार मोहनभाई बुचडे यांनी मुलांचे कौतुक केले. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे व पर्यवेक्षक संजय पाटील यांनी मुलांचे अभिनंदन केले.